Abhishek Ghosalkar । 8 फेब्रुवारीला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. मॉरिस नरोना याने त्याच्याच कार्यालयात फेसबूक लाइव्ह सुरू असताना अभिषेक यांची हत्या केली. मॉरिसने गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. या हत्येनंतर मॉरिस स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहे. सध्या देखील या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । अजित दादांनी खेळली मोठी खेळी
अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी आरोप केलेल्या मेहुल पारेखचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या हत्या प्रकरणामधील प्रमुख आरोपी मॉरिस नरोना याचा तर मृत्यू झाला. मात्र त्याचा मित्र मेहुल पारेख याचा सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
न्यूज १८ लोकमतने ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सीसीटीव्हीच्या या फुटेजमध्ये मेहुल पारेख गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत दिसत आहे. मेहुल हा अधिकाऱ्यांसोबत असताना सिगारेट ओढत जाताना दिसतोय. घोसाळकर कुटुंबीयांकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. आणि यामध्येच आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.