Abhishek Ghosalkar Case । फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दहिसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपी मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. य घटनेने महाराष्ट्र चांगलाच हादरला असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सध्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तपासादरम्यान एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यावेळी हत्याकांड झाले त्यावेळी आरोपी मॉरिस याच्यासोबत काही लोक ऑफिसमध्ये आले होते. गोळीबार होण्याआधी ते त्या ठिकाणाहून बाहेर पडले असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये आरोपी मॉरिसचा मित्र मेहुल सुद्धा दिसत आहे. ज्यावेळी मॉरीसने गोळीबार केला त्यावेळी मेहुल त्या ठिकाणावरून बाहेर गेला आणि रिक्षा जवळ थांबला. त्यानंतर परत एकदा पान टपरी जवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.