Abhishek Ghosalkar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर अभिषेक घोसाळकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना करुणा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. (Firing on former corporator of Thackeray group Abhishek Ghosalkar)

Accident News । भयानक अपघात! परीक्षेला जाताना तिन बहिण-भावावर काळाचा घाला; डंपरने चिरडलं

घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत. त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात मागच्या काही दिवसापासून गोळीबारांच्या घटनेत वाढ झाली आहे. नेत्यांवर गोळीबार होण्याची प्रकरणे वाढत चालली आहेत. सध्या अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी!

ठाकरे गटाचे असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला आहे.

Ajit Pawar । प्रसिद्ध अभिनेत्रीने केली थेट अजित पवारांवर टीका; म्हणाली, “बेईमानी ओळखते…”

Spread the love