
Abhishek Ghosalkar Firing । मुंबईतील दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. विशेष म्हणजे घोसाळकर यांना गोळ्या घालणारा आरोपी मॉरीस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडली. त्याने स्वतःवर चार वेळा गोळी झाडली. त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Maratha Reservation । “माझा जीव गेल्यावर…”, मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा
मॉरिस नोरोन्हा (morris noronha) याने अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची याबाबत यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बंदूक कशी चालावयची असं मॉरिसने यूट्युबवर सर्च केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिसने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Shirsath । ब्रेकिंग! संजय राऊतही सोडणार ठाकरेंची साथ? बड्या नेत्याचा दावा
दरम्यान, मॉरिस नोरोन्हा यानं साडी पाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवलं होतं. यावेळी त्याने फेबसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे.
Congress । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसचे ‘हे’ आमदार भाजपच्या गळाला