केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा दावा व पक्षचिन्ह शिंदे गटाकडे दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली असून यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत मोठे आणि गंभीर विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
आताची सर्वात मोठी बातमी! अहमदनगरमधील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट? किंवा सत्तांतर घडवण्यासाठी खरंच 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
“अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन”, नारायण राणेंचा गंभीर इशारा
दरम्यान संजय राऊत यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 40 ते 50 आमदार, 13 खासदार आणि हजारो नगरसेवक पैसे देऊन खरेदी करता येतात का? असा उलट सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
अभिजित बिचुकले यांनी केली मोठी मागणी; म्हणाले, “कसबा पोटनिवडणूक रद्द करा”
यावेळी ते म्हणाले की, ” ग्रामपंचायतमधील एखादा सदस्य पार्टी सोडण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. मात्र इथे 40 ते 50 आमदार, 13 खासदार आणि हजारो नगरसेवक शिंदे गटासोबत आले आहेत. मग एवढे लोक पैसे देऊन खरेदी करता येतात का?” मी आता आरोपाने उत्तर न देता राज्याचा विकास करून माझ्या कामाने उत्तर देईन. असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
सलमान खानला पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचा हिरो आता म्हतारा दिसू लागलाय”