
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू आहे. दररोज शेकडो नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. ताज्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,092 नवीन रुग्ण आढळले असून, देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,16,861 वर पोहोचली आहे. शनिवारी कोरोनाचे 15,815 नवीन रुग्ण आढळले. माहितीनुसार, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे आठ टक्क्यांनी घट झाली आहे.
सध्या देशामध्ये पुनर्प्राप्तीचा दर 98.54 टक्के आहे, तर सक्रिय केस 0.26 टक्के आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 16,454 लोकांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,36,09,566 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना लसीचे 28,01,457 डोस देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 207.99 डोस देण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाच्या 3,81,861 चाचण्या घेण्यात आल्या, जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वेळेत ओळखता येतील, त्यामुळे चाचण्यांची संख्या 88.02 कोटींवर गेली आहे. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दिल्लीत शनिवारी कोविड-19 मुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आणि संसर्गाची 2,031 नवीन प्रकरणे नोंदली गेली.