सध्या अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एका विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणाच्या अचानक जाण्याने गावावर देखील शोककळा पसरली आहे. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपस करत आहेत. (A shocking incident of a strange accident has taken place in Buldhana.)
बुलढाण्याच्या खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव साकार्शा या गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे. दोन कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की तीन तरुण या अपघातामध्ये जागीच ठार झाले आहे.
अजित पवार शांत बसणार नाहीत, ते दगाफटका करणार; मोठा गौप्यस्फोट
त्याच झालं असं की, भरधाव बाईकने आधी एका कारला धडक दिली. ही अनियंत्रित बाईक दुसऱ्या गाडीवर धडकली. यावेळी हा अपघात घडला या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. बाईकवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आता जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rishabh Pant । ऋषभ पंतचे कृत्य पाहून चाहते झाले खुश; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?