Site icon e लोकहित | Marathi News

Accident | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Accident | Another terrible accident on Samriddhi Highway; Three people died

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) बांधल्यापासून या महामार्गावर प्रचंड प्रमाणात अपघात झालेले आहेत. ते सत्र अजूनही थांबलेले नाही. मुंबई नागपूर समृद्धी (Samruddhi Highway Accident) महामार्गावर अजून एक गंभीर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज त्या मार्गावर वॅगनॉर (WagonR) गाडीचा भीषण अपघात होऊन त्यामधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.

वरात दारात येऊन थांबली अन् नवरी मुलगी प्रियकरासोबत पळाली; नंतर वडिलांनी घेतला मोठा निर्णय, त्याच मंडपामध्ये…

हा गंभीर अपघात जालन्यातील (Jalana) निधोना (Nidhauna) गावाजवळ झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या रुग्णांना ताबडतोब जालन्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या कारने कंटेनरला मागून येऊन धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की कारच्या पुढचा सर्व भाग चुराचुरा झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांनी आपला प्राण गमावला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? असं का बोलल्या अमृता फडणवीस?

या घडलेल्या भीषण अपघातामध्ये एक प्रवासी हा नागपूरचा आहे अशी माहिती मिळाली आहे. तर इतर मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची अजूनही माहिती मिळालेली नाही. जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. ते प्रवासी मुंबईवरून नागपूरकडे जात होते, त्यावेळेस हा अपघात झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग! ओमराजे निंबाळकर थोडक्यात वाचले; डम्पर अंगावर घाण्याचा प्रयत्न मात्र…

Spread the love
Exit mobile version