
Pune Accident । मंचर : हल्ली अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे. अनेक अपघात हे वाहन चालकांच्या चुकांमुळे होत असतात. पण या अपघातात विनाकारण निष्पाप लोकांचा जीव जातो. भीषण अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात. अनेक उपाय करूनही अपघात कमी झाले नाहीत. सध्या असाच एक विचित्र अपघात राष्ट्रीय महामार्गावर (Accident on National Highway) झाला आहे. यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पासून जवळ असलेल्या भोरवाडी परिसरात पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता. त्याच ठिकाणी आज सकाळी एक टेम्पो आणि स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असणाऱ्या कंटेनरला जाऊन धडकला. काही वेळेतच स्विफ्ट गाडीने पेट घेतला.
Attack on MLA । काँग्रेस आमदाराची फोडली कार, कार्यक्रमावेळी घडली धक्कादायक घटना
पाहता पाहता स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून गेली. या भीषण अपघातात स्विफ्ट गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने स्विफ्ट कारचा चालक आणि टेम्पो चालक बचावले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींचा तपशील अजून प्राप्त झाला नाही. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Ajit Pawar । ‘अजित दादा भाषणाच्यावेळी बाथरुममध्ये पळायचे’; बड्या नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य