Site icon e लोकहित | Marathi News

Accident News । ट्रक आणि जीपचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

Accident News

Accident News । देशात सतत कोठे ना कोठे अपघात (Accident) होतात. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तर काहीजण जखमी होतात. परंतु या अपघातामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. बहुतांश अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला आहे. (Pune News )

Exit Poll 2023 । मोठी बातमी! भाजपला धक्का बसणार? छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेस विजयाच्या वाटेवर

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मंचरजवळ पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला.

Hingoli News । धक्कादायक! चालू भरधाव बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, स्टेअरिंगवरच सोडले प्राण

या अपघातामध्ये जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

Gas Cylinder Price । डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलेंडरचे दर वाढले

Spread the love
Exit mobile version