Accident News । सुट्टी म्हटलं की अनेक जण फिरण्याचा प्लॅन तयार करतात. सध्या ख्रिसमस निमित्त सलग सुट्ट्या असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबासोबत पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. यामध्येच आता गुजरात मधून देखील अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Bus Accident News)
प्रवाशांनी भरलेल्या सुसाट बसने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला आहे. (Gujarat Bus Accident News) हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी मधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
Gautami Patil । काय सांगता? गौतमी बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच
याबाबत अधिकची माहिती अशी की, गुजरात मधील राजकोट या ठिकाणाहून ६० प्रवाशांना घेऊन एक लक्झरी बस बलरामपूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली व हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बस आणि ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.