Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बस मध्ये जवळपास २५ प्रवासी जखमी झाले आहेत तर त्यामधील ४ प्रवाशांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Jalna Bus Accident)
चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट पुलाखाली कोसळली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळतात मदत कार्य सुरू करण्यात आले आणि जखमी लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)
या घटनेनंतर तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, ही बस पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बदनापूर या ठिकाणी आली असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली आणि ही धक्कादायक घटना घडली.
Ajit Pawar । राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “निवडणूक आयोग…”
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत कार्यास सुरुवात केली. त्यानंतर जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये २५ प्रवाशी जखमी झाले असून चार जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Tomato Subsidy । टोमॅटोला अनुदान जाहीर करा! शेतकऱ्यांची मोठी मागणी