Accident News । सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पती-पत्नीचा आहे. आता पती-पत्नीचा व्हिडिओ म्हटले की, तुम्हाला असं वाटेल नक्कीच हा व्हिडिओ भांडणाचा असेल. मात्र हा व्हिडिओ भांडणाचा नसून वेगळाच आहे. पत्नीच्या विनंती नंतर पती तिला बाईक चालवायला शिकवत असल्याचे दिसत आहे. मात्र यावेळी पत्नीचा अपघात झाला आहे. (Viral Video )
Gautami Patil । काय सांगता? गौतमी बनली पोलिस ऑफिसर? व्हिडीओ एकदा पहाच
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवऱ्याने बायकोला बाईक चालवायला दिली यानंतर ती हळूहळू बाईक चालू लागली. मात्र थोडी पुढे जाताच नवऱ्याने तिला ब्रेक दाबायला सांगितले मात्र तिने नवऱ्याचे ऐकले नाही पण त्याचा परिणाम अतिशय भयानक झाला आहे. बायकोचा मोठा भीषण अपघात झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बाईक चालवताना काय करावं आणि काही करू नये याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. ही महिला डोक्यावर हेल्मेट वगैरे घालून बाईक वर बसली होती मात्र तिच्या पतीच्या सूचनांचे पालन तिने न केल्याने तिचा मोठा अपघात झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.