Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील चिल्ला रोडवर सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Rishikesh Road Accident) या दुर्घटनेत वनरक्षक आणि उप रेंजरसह चार वन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या वॉर्डनचाही पत्ता नाही. विभागाला मिळालेल्या नवीन वाहनाची वन कर्मचारी ट्रायल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Uttarakhand Accident)
Breaking News । ब्रेकिंग! आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरेंना दोन मोठे धक्के
चिल्ला रेंजमध्ये ट्रायल सुरू असताना टायर फुटल्याने कार डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. वनविभागाच्या नवीन वाहनात एकूण 10 जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. (Uttarakhand Road Accident)
अपघातानंतर वनविभागात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह वनमंत्री सुबोध उनियाल यांनीही शोक व्यक्त केला आहे. पीसीसीएफ वन्यजीव समीर सिन्हा यांनी सांगितले की विभागात नवीन वाहन आले आहे. वाहनाची चाचणी घेण्यासाठी कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी गेले होते. या दुर्घटनेत दोन आश्वासक रेंज अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
एक वरिष्ठ अधिकारी अद्याप बेपत्ता आहे. त्यांच्या दु:खाच्या वेळी विभाग कुटुंबासोबत आहे. मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एम्समध्ये पाठवण्यात आले आहेत. राजाजी राष्ट्रीय उद्यानातील बेपत्ता वॉर्डनच्या शोधात वनविभागाचे पथक व्यस्त आहे. पोलीस तपासानंतर आवश्यक ती कारवाई करतील.