Accident News । राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी सीकरच्या लक्ष्मणगढ पोलीस स्टेशन परिसरात दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पोलीस उपनिरीक्षक मोहन सिंग यांनी सांगितले की, जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर सीकरहून लक्ष्मणगढकडे जाणारी एक कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या कारला धडकली. (Sikar Road Accident)
हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर, मृतदेह ओळखण्यासाठी आणि शवविच्छेदनासाठी लक्ष्मणगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक सिंह यांनी सांगितले की, अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही आणि पोलिस मृत आणि जखमींची माहिती गोळा करत आहेत. डेप्युटी एसपी धर्माराम गिला यांनी सांगितले की, आम्हाला महामार्गावर दोन वाहनांची टक्कर झाल्याची माहिती मिळाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH राजस्थान: सीकर में दो वाहनों की आपस में टक्कर हुई। pic.twitter.com/H5Bkuq9tfE
— ANI_HindiNews (@AHindinews) January 14, 2024