Site icon e लोकहित | Marathi News

Accident News । ब्रेकिंग न्यूज! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Ashok Nete's car met with a major accident

Accident News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या गाडीला मोठा अपघात (Ashok Nete’s car met with a major accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगावाजवळ हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून भाजप खासदार अशोक नेते हे थोडक्यात बचावले असल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Accident News)

Mark Zuckerberg Injury । मोठी बातमी! फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये अशोक नेते यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये सुदैवाने ते सुखरूप बचावले आहेत. नुकतीच महायुतीची काल रात्री मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला महायुतीचे सर्व आमदार खासदार आले होते. त्यामुळे या बैठकीसाठी अशोक नेते हे सुद्धा मुंबईला गेले होते. त्यानंतर मुंबईतील बैठक आवरून अशोक नेते रात्री उशिरा नागपूरला दाखल झाले होते. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी नागपूर मध्येच मुक्काम केला.

ST Bus । दिवाळीपूर्वीच महागला लालपरीचा प्रवास, एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ

त्यानंतर आज सकाळी ते नागपूरहून गडचिरोलीला रवाना झाले मात्र या दरम्यान आज सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघाताची घटना घडली त्यावेळी गाडीच्या एअरबॅग निघाल्या त्यामुळे गाडीत बसलेल्या कुणालाही दुखापत झाली नाही. यामधील सर्वजण सुखरूप आहेत.

Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सवलती

Spread the love
Exit mobile version