Site icon e लोकहित | Marathi News

Accident News । मन हेलावून टाकणारी घटना! आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू

Accident News

Accident News । सध्या अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील भाईंदर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये आईच्या मांडीवर असलेल्या अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhayandar Accident News)

Rahul Narvekar । राहुल नार्वेकर यांचा संजय राऊतांना इशारा; म्हणाले, “यामुळे सरकार पडत नाही…”

याबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबईतील भाईंदर परिसरामधील कुणाल शाह यांच्या पत्नीचा 25 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यावेळी ते त्यांच्या अकरा महिन्यांच्या बाळासह बाहेर आनंद साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्या आनंदावर वाटेतच विरजण पडले. त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांनी आपल्या अकरा महिन्याच्या चिमुकल्याला गमावलं यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Viral Video । चालत्या ट्रेनमध्ये पुरुषाने केले अश्‍लील कृत्य; महिलेने चप्पलने मारले अन्…

याबाबत अधिकची माहिती अशी की, हे जोडपे वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून हॉटेलला चालले होते. यावेळी रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि आईच्या हातातून 11 महिन्यांचा मुलगा खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला दुखापत झाली. दरम्यान डोक्याला मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Supriya Sule । दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात, सरसकट कर्जमाफी करा – सुप्रिया सुळे

Spread the love
Exit mobile version