
Accident News । सध्या राज्यभर गणेशउत्सवाची तयारी सुरू आहे. गणेश उत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र याची तयारी सुरू आहे. अनेक जण कोकणातील गावी जाण्याच्या तयारीत आहेत. चाकरमान्यांची कोकणातील गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावरच एक मोठी दुर्घटना घडली आहे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये डोंबिवलीतील भाविकाचा मृत्यू झाला आहे. (Accident News)
Maratha reservation । आंदोलन तापले! आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तारले असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते डोंबिवली पश्चिमचे रहिवासी असून ते गणेशोत्सवासाठी त्यांची पत्नी आणि मुलासह राजपुरला चालले होते. यावेळी ते बस ने प्रवास करत असताना त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे. अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
Havaman Andaj । मोठी बातमी! आजपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी
सध्या त्यांच्या पत्नीवर आणि मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. ऐन सणाच्या काळात झालेल्या या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असून डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली आहे. राजापूरच्या दिशेने निघालेल्या एका एसटी बसला डंपरणे माणगाव येथे जोरात धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या बस मध्ये जवळपास 38 प्रवासी होते. या धडकेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी देखील झाले आहेत.