Site icon e लोकहित | Marathi News

Accident News । हातात फक्त हॉल तिकीट राहिलं, दहावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

Accident News

Accident News । नवी मुंबईतील तुर्भे येथे एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात दहावीचा विद्यार्थी दीपांशु राजेश बौद्ध याचा अपघातात मृत्यू झाला. दीपांशु हॉल तिकीटचा प्रिंटआउट घेण्यासाठी आपल्या मित्रासोबत सायकलवर निघाला होता. या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्याला जोराची धडक दिली. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी दीपांशुला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Sourav Ganguly । ब्रेकिंग! सौरभ गांगुलीच्या कारचा अपघात, थोडक्यात वाचला माजी क्रिकेटर

दीपांशु दहावीचा विद्यार्थी होता आणि त्याची परीक्षा लवकरच सुरू होणार होती. हॉल तिकीट घेण्यासाठी तो मित्राच्या सोबत तुर्भे नाका फायझर रस्त्यावर जात असताना ही दुर्घटना घडली. डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला, त्यामुळे दीपांशुचा जीव गेला. पोलिसांनी डंपर जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Manikrao Kokate । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपदावर संकट

या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून दीपांशुच्या कुटुंबीयांसाठी ही एक मोठी धक्का देणारी घटना ठरली आहे.

GBS । धक्कादायक! अचानक अशक्तपणा, जुलाबाचा त्रास, GBSने आणखी दोन जणांचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version