Accident News । लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला! कारचा भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्यासह ३ जणांचा जागीच मृत्यू

Accident News

Accident News । दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. रस्ते अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमावाव लागतो. अनेककांचे संसार देखील यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लग्नसराई सुरू असून लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तवेरा गाडीला भीषण अपघात झाला आहे. (Tavera car accident at Ekodi Dandegaon under Tiroda taluka of Gondia district)

Amol Kolhe । “ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत..”, अमोल कोल्हे यांनी कुणावर साधला निशाणा?

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या एकोडी दांडेगाव इथं तवेरा गाडीचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच अपघातातील जखमी लोकांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Samruddhi Mahamarg Accident । समृद्धी महामार्गावर वन्यप्राणी आडवा आल्याने भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच ते सहा प्रवासी यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Satara News । साताऱ्यात धक्कादायक प्रकार! गल्लीतल्या शौचालयात मध्यरात्री दिसली अघोरी पाहुणी; दृश्य पाहून बायका तापाने फणफणल्या

Spread the love