
Accident News । सध्या नाशिक-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात (Fatal accident on Nashik-Pune highway) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर जवळपास दहा जण यामध्ये जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे. (Accident News)
नाशिक-पुणे महामार्ग वरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीहून आळंदीकडे दिंडी चालली होती. यावेळी भरधाव वेगाने येणारा कंटेनर यामध्ये घुसला आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक देखील मोठी खोळंबली होती. या अपघातात तीन ते चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नऊ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघाताला कारणीभूत हा कंटेनरचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर मद्यपान करून वाहन चालवत होता. त्यातच त्याला डुलकी लागली आणि हा अपघात घडला. मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी कंटेनरची मोठी तोडफोड देखील केली आहे.