Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव दुचाकीने एका महिलेला आणि तिच्या सहा महिन्याच्या बाळाला उडवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकीने महिलेला उडवलं आणि त्यानंतर दुचाकीवर असलेले दोन जण घटनास्थळावरून पसार झाले.
Gopichand Padalkar । ‘छगन भुजबळ तुमचा बाप…’, आमदार गोपीचंद पडळकर भडकले
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघातामध्ये बाळ आणि आई जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आईला व बाळाला मदत केली. त्यानंतर दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीस्वार त्या ठिकाणाहून पळाले. (Mumbai Acciden tNews )
Indapur News । मोठी बातमी! इंदापूरसह अनेक भाग गंभीर दुष्काळ म्हणून जाहीर करण्यासाठी उपोषण
माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारायण नगर होमगार्ड परिसरात ही घटना घडली आहे. भरधाव दुचाकीवर दोन तरुण येत होते त्यांनी महिलेला उडवलं आणि ही महिला आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह जमिनीवर कोसळली. त्यानंतर अपघात स्थळी दुचाकी न थांबता दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढला.
Crime News । हृदय पिळवून टाकणारी घटना! 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, दगडाने चेहरा ठेचला अन्…