Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हणी घाट परिसरात खाजगी ट्रव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हणी घाट परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटली आणि मोठा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. (Mangaon Accident)
या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले यानंतर बचावकार्यास सुरवात केली. यामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
ANI वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला आहे. त्याचबरोबर चालकांनी घाट परिसरात वाहने सांभाळून चालवावीत असं देखील पोलिसांनी आव्हान केले आहे.