Accident News । अपघाताच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाही सतत कुठे ना कुठे दररोज अपघात होत असतात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा वन्यप्राणी आडवे येऊन, टायर फुटून, अशा अनेक वेगवेगळ्या कारणाने अपघात होत असतात. सध्या देखील कर्नाटकामध्ये भीषण अपघाताची (Karnataka Accident) घटना समोर आली आहे.
कर्नाटकमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील (Karnataka) चिकबल्लापूर (Chikkaballapur) या ठिकाणी ही घटना घडली आहे. सध्या या अपघाताचा तपास कर्नाटका पोलिसांकडून सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील चिकबल्लापूर या ठकाणी बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हा अपघात झाला आहे. भरधाव कारने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. ही कार बागेपल्लीवरून चिक्कबल्लापूरला जात होती. ही घटना गुरुवारी सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास घडली.
Ajit Pawar | ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…