
Accident News । सध्या अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले आहेत. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Pune News | पुण्याच्या नवीन पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय! आता पुण्यातील गुंडाना…
याबाबत अधिकची माहिती अशी की, दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. आणि भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये परीक्षेला जाणाऱ्या तीन बहिण-भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेने तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी!
मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. त्यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
baba siddique | महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा