
Accident News । सध्या नागपूरमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस गाडी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Accident News)
क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती यावेळी ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमातून परतताना या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामध्ये जखमी असलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.