
Accident News । अपघाताच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाही. सतत अपघाताच्या घटना ऐकायलाच मिळतात. अगदी छोट्याशा चुकीमुळे मोठे अपघात घडत असतात. सध्या देखील जळगावमधून अपघातासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Accident News)
Roof collapsed । झोपेत असताना काळाचा घाला, छत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकून बस उलटली आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी लोकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमी रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामधील दोन व्यक्तींना पहिल्यांदा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Asia Cup 2023 । पावसामुळे फायनल होऊ शकली नाही तर ‘या’ संघाला मिळणार ट्रॉफी