Accident News । केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Prahlad Patel) यांचा मंगळवारी रस्ता अपघात झाला. या अपघातात केंद्रीय मंत्र्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र या घटनेत एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री पटेल यांचा ताफा छिंदवाडा येथून जनसंपर्क अभियान आटोपून नरसिंगपूरला परतत होता. तेवढ्यात त्यांच्या ताफ्यासमोर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी आली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मंत्र्यांची गाडी शेतात उतरली. या अपघातात प्रल्हाद पटेल किरकोळ जखमी झाले.
Maharashtra Politics । पडद्यामागं नेमकं काय घडतंय? उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट
नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रल्हाद सिंह पटेल हे छिंदवाड्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रम आटपून नरसिंहपूर जात होते. यावेळी संबंधित अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. (Union Minister Pralhad Patel met with a road accident on Tuesday)
Maratha Reservation । मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये खडाजंगी, शिंदे आणि अजित पवार गट आमनेसामने
कोण आहेत प्रल्हाद पटेल?
प्रल्हाद सिंग पटेल हे 7 जुलै 2021 पासून भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. ते मध्य प्रदेशातील दमोह लोकसभा मतदारसंघातून खासदारही आहेत. मध्य प्रदेशातील भाजप-आधारित मतदारसंघातून ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. मे 2019 मध्ये पटेल हे सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र आयुक्त) बनले. 2019 मध्ये ते भाजपचे सदस्य म्हणून मध्य प्रदेशातील दमोह येथून लोकसभेवर निवडून आले.
Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! आमदाराची तब्येत खालावली