Accident News । कामावरून घरी चालले होते मात्र काळाने घातला घाला; रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात ९ जणांचा मृत्यू

Accident News

Accident News । सध्या एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑटोतुन प्रवास करणाऱ्या 13 जणांचा अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ऑटोचे चक्काचूर झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ऑटोचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिहारमधील लखीसराय येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे.

Raj Thackeray । मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “गेल्या वेळेप्रमाणे जर कोर्टात…”

केटरिंगचे काम आटोपून घरी येताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये 8 लोक मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील केशवपूर नया टोला येथील रहिवासी आहेत. मृत ऑटोचालक लखीसराय जिल्ह्यातील महिसोना गावचा रहिवासी आहे.

Pune Police । पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई कुरकुंभ एमआयडीसीतील कंपनीत ड्रग्सची निर्मिती; आत्तापर्यंत 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

केटरिंगचे काम करून सर्वजण परतत होते

या घटनेबद्दल सांगितले जात आहे की, मुंगेर जिल्ह्यातील 13 लोक, जे जमुईच्या सिकंदरा येथील रिसेप्शनवरून केटरिंगचे काम करून परतत होते, ते रात्री उशिरा ऑटोने लखीसराय रेल्वे स्टेशनकडे जात होते. यादरम्यान झालौना गावाजवळ चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह ६ जणांना पोलिसांनी सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar । इंडिया आघाडीतील वादविवादावर शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love