
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान सोलापुरातील भाविकांच्या कारचा भीषण अपघात ( Car Accident) झाला आहे. हे भाविक आंध्र प्रदेशमधील तिरूपती बालाजीचे ( Tirupati Balaji, Andhra Pradesh) दर्शन घेऊन परत येत होते. यामध्ये चार जणांचा अपघात झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
सुप्रिया सुळेंनी चक्क बैलगाडीतून सफर करत केली शेताची पाहणी!
तिरुपतीच्या जवळ चंद्रगिरीच्या इथे हा अपघात झाला आहे. रस्त्यावरील दुभाजकाला कार आदळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात जखमी झालेले लोक मूळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत. हे सर्व लोक तवेरा कारमधून बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे.
उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा चर्चेत; राजकीय बंडानंतर प्रथमच जाणार शिंदेंच्या बालेकिल्ल्यात
सोलापूरकडे परतत असताना तिरुपतीच्या बाहेर आल्यानंतर चंद्रगिरी तालुक्यात हा अपघात झाला. यावेळी नायडूपेट-पूथलापट्टू रस्त्यावर तवेरा कार अचानक दुभाजकावर जाऊन आदळली. दरम्यान कार अधिक वेगात असल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जखमी झालेल्या पाच जणांना स्थानिक पालिसांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
राखी सावंतच्या लग्नाबद्दल पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “…तर कधी मुस्लीम बनते”