समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) बांधल्यापासून या महामार्गावर प्रचंड प्रमाणात अपघात झालेले आहेत. ते सत्र अजूनही थांबलेले नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहन अनियंत्रित होऊन, वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! शरद पवार यांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता BRS मध्ये जाणार
आज (रविवार) दुपारी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार आगासखिंड शिवारात पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळून अपघात झाला आहे. ही कार जवळपास ४० फूट खाली कोसळली आणि हा भीषण अपघात झाला.
चालकाचे करवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही कार पांढुर्ली आगासखिंड रस्त्यावर असलेल्या अंडरपासच्या पुलावरून कठडे तोडून खाली कोसळली.
धक्कदायक! प्रियकराला भेटायला गेली अन् मित्रांनीच घेतला फायदा ..