Accident । सध्या पालघरमध्ये अपघाताची एक धक्कादाय घटना घडली आहे. पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावितही घटनास्थळी दाखल झाले.
AI Death Calculator । काय सांगता? आता AI सांगणार मृत्यू कधी होणार, कसं ते जाणून घ्या
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्यास सुरुवात केली. त्यानंतर यामधील जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातामधील जखमी झालेल्यांपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भयानक होता की यामध्ये एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, आज सकाळी ताम्हिणी घाटात बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 55 जण जखमी झाले आहेत.