Accident Video । भारतात खूप प्रगती होत आहे पण अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. शहरांमध्ये राहणारे लोक अनेकदा तक्रारी करून थकतात आणि त्याच खराब रस्त्यांवर आपले जीवन जगण्यासाठी परत जातात. मात्र काही लोक असे आहेत जे प्रशासनाच्या कानावर आपले म्हणणे पोहचवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही लोक सोशल मीडियाचीही मदत घेतात. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी काही क्षणात एखादी गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहचते.
OpenAI सीईओने बेस्टफ्रेंडसोबत केले लग्न, अनेक दिवसांपासून करत होते डेट; लवकरच मूलही होणार
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या खराब स्थितीचे वर्णन करत आहे. हे सांगताच एक भीषण अपघात होतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खराब रस्त्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करत आहे. ती व्यक्ती लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे दाखवत आहे. ते सांगताच बघा इथे खड्डा आहे आणि रोज कुणाचा ना कोणता तरी अपघात होतोय. असे सांगत आहे.
Ravindra Chandrashekhar | बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल
तेवढ्यात भरधाव वेगाने येणारा एक ऑटो खड्ड्यात आदळतो आणि पटकन मागे वळतो आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडतो. काही वेळातच तिथे गर्दी जमते. @gharkekalesh नावाच्या पेजवरून X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी पाहिला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
Chad Uncle found us Some content💀 pic.twitter.com/T75kZaNgAp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 11, 2024