Breaking : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; वाचा सविस्तर

Accidental death of Shiv Sangram president Vinayak Mete; Read in detail

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. अपघातामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

विनायक मेटे त्यांचा एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत जात असताना हा अपघात झाला आहे. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) एमजीएम रुग्णालयात दाखल झाले.

विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *