मागच्या पाच सहा दिवसापूर्वी राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.
बिग ब्रेकिंग! शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांना अटक
त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान म्हणजेच आज आणि उद्या हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
नारायण राणे यांच मंत्रिपद जाणार, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
पुणेकरांची उष्णतेने सुटका होणार आहे. पुण्यामध्ये 13 ते 15 मार्च दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे.
‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेबांचे संस्कार …”