राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्याने मोठा भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत सहभागी झाल्याने भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसफूस सुरु झाली होती. शपथविधी पार पडूनही अजित पवार गटाला खाते दिले नव्हते. त्यामुळे या गटाची अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. (Latest News)
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना अर्थ खातं दिले आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते तसेच धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन खाते, संजय बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण खाते दिले आहे. त्याशिवाय अनिल भाईदास पाटील यांना क्रीडा खाते तर अदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खाते देण्यात आले आहे.
दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. हे खाते त्यांना मिळू नये अशी शिंदे गटाची इच्छा होती. अनेकांचे या खाते वाटपाकडे लक्ष होते. आज अखेर त्यावर तोडगा निघाला आहे.