
Chanakya Niti । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विद्वान होते. त्यांनी तक्षशिला या ठिकाणी अनेक वर्षे अर्थशास्त्र हा विषय शिकवला. चाणक्यांनी अर्थशास्त्र (Economics) तसेच नैतिकतेसोबत बरेच ग्रंथ लिहिले आहेत. आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात जीवनातील प्रत्येक स्वरुपाबद्दल सांगण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाणक्य नीति या ग्रंथात (Chanakya Niti) सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर एखाद्याला यश मिळते. (Latest Marathi News)
त्यामुळे आजही अनेकांना त्यांची धोरणे वाचायला आणि ती आत्मसात करायला खूप आवडतात. त्यांनी त्यांच्या या ग्रंथात आपल्या शत्रूवर सोप्या पद्धतीने विजय कसा मिळवायचा ते सांगितले आहे. जर तुम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या शत्रूवर सहज विजय मिळवता येईल.
- आपल्या शत्रूला पराभूत करायचे असेल तर शिस्त आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
- सतत काही ना काही शिकत राहा. नवनवीन कल्पना शोधून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्या. त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येईल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील माहिती गोपनीय ठेवा, नाहीतर ती तुमच्या विरोधात वापरण्याची शक्यता असते.
- त्याशिवाय तुमची ध्येय साध्य करण्यासाठी त्या दृष्टीने योजना तयार करा. तुम्हाला योग्य ती दिशा मिळाल्यास तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि तुमचे विरोधक विचलित होतील.
- सतत प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या गोष्टी टाळा.
Mumbai News : बाळ नाल्यात पडलं त्यावेळी नेमकं काय घडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा क्षण