GN Saibaba Acquitted । सर्वात मोठी बातमी! न्यायालयाने केली नक्षलवादी संबंध प्रकरणी जीएन साईबाबासह ५ जणांची निर्दोष मुक्तता

GN Saibaba Acquitted

GN Saibaba Acquitted । नागपूर : बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा (GN Saibaba) यासह त्याच्या पाच सहकाऱ्यांचा अपिल अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने मंजुर करत आता त्यांना मुक्त केले आहे. त्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये ऊसतोड मजुराने झाडल्या मुकादमावर गोळ्या, कारण जाणून व्हाल चकित

पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. सुनावणी वेळी युएपीए अंतर्गत कारवाईवेळी नियम पाळले गेले नसल्याचे ताशेरे ओढले. जीएन साईबाबा यांच्यासह इतर चार आरोपी निर्दोष आहेत, असे निकालात न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारसह पोलीस दलाला खूप मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra politics । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याची आज होणार एसीबी चौकशी

साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणाहून पुरावे गोळा करताना डिजिटल पुरावे गोळा करत असताना नियमांचे उल्लंघन केले आहे असे न्यायालयाने म्हटलं आहे. जीएन साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करता आले नसल्याने आता या आधारावर जी एन साई बाबा, महेश तिरकी, प्रशांत राही, हेम मिश्रा आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे.

Section 144 In Pune । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात लागू केले १४४ कलम, नेमकं प्रकरण काय?

Spread the love