फडणवीसांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या ‘त्या’ वकिलासह ६ जणांवर कारवाई, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Action against 6 people including 'that' lawyer who filed a case against Fadnavis, know the actual case

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अडचणीत आणणारे वकील सतीश उईके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सतीश उईके (Satish Uike) यांनी फडणवीस यांच्यावर २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार केली होती तसेच त्यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Latest Marathi News)

Bigg Boss Ott Season 2 Winner | एल्विश यादव ठरला बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता

परंतु सतीश उईके यांच्याविरोधात नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी ईडीकडे (ED) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सतीश उईके यांची ईडीने एकूण १२ तास चौकशी केली आणि त्यांना अटक केली आहे. खोटी कागदपत्र तयार करून त्याच्या माध्यमांतून ब्लॅकमेल करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे, असा आरोप त्यांच्यावर केला आहे.

Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

त्याशिवाय सतीश उईके यांच्यासह इतर सहा जणांनी विठ्ठल ढवळे यांच्या मालकीची ११ कोटी रुपयांची जमिन बळकावली आहे. या प्रकरणी ईडीने उईके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उईके एप्रिल २०२२ पासून आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. आता त्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी सतीश उईके यांच्यासह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Raj Thackeray । भाजपने युतीसाठी ऑफर दिली आहे पण… राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Spread the love