
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 2022 च्या शेवटच्या दिवशी खळबळजनक ट्विट केले होते. ज्यामध्ये नवीन वर्षात ईडी (ED) कडून कारवाई होणार असलेल्या नेत्यांवर कारवाई होणार होती. या पार्श्वभूमीवर त्या यादीतील पहिले नेते माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या १०.२० कोटी रुपयांची मालमत्तेवर ईडीने तात्पुरती जप्ती आणली आहे.
गैरसमज मिटले! महावितरणचे खासगीकरण होणार नाही ; सरकार व संघटनांची बैठक पार पडली
शिवसेनेचे( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांच्यावर ईडीकडून झालेल्या कारवाई मध्ये रत्नागिरी ( Ratnagiri) मधील 42 गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. याची किंमत 7 कोटी 46 लाख 47 हजार इतकी आहे.
मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम ! होतो लाखो रुपयांचा फायदा
झालंय असं की, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल परब यांच्या रिसॉर्ट विरोधात दापोली येथील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्ग तपास सुरू केला आहे.
म्हणून रितेश आईला एकेरी हाक मारतो ; रितेशचा हा खुलासा वाचून तुम्हीही व्हाल थक्क !
दरम्यान पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने अनिल परब यांच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर परिपत्रक देखील ईडीकडून जाहीर करण्यात आले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकवून देणार नाहीत ; कपिल देव यांचे गंभीर विधान