Sharad Pawar । राज्याच्या राजकीय इतिहासात आज पुन्हा अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांचा आज दुपारी शपथविधी सोहळा पार पडला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
याबाबत बोलताना पवार म्हणाले की, “दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं वक्तव्य केले होतं. परंतु मला आता आनंद आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ देऊन त्यांनी या आरोपातून राष्ट्रवादीला मुक्त केल्याबद्दल मी मोदींचा खूप आभारी आहे.अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. येत्या २ ते ३ दिवसात त्यांच्यावर कारवाई होईल, असे शरद पवार म्हणाले आहेत.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
1980 साली मी अवघ्या 5 ते 6 आमदार घेऊन पक्ष उभा केला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. मी पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्यांना माझा निर्णय सांगेन. राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या इतर 9 जणांवर कारवाई होणार असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पुढच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप, अजित पवार उपमुख्यमंत्री होणार?