अकोला: समाजात दोन टोकाची माणसे पहायला मिळतात एक तर प्रेम करणारी आणि दुसरी म्हणजे द्वेष करणारी. या दुसऱ्या टोकाच्या माणसांकडून अकोला येथे कुत्र्यांवर विषप्रयोग करण्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या आहेत. यासाठी पेढे व तत्सम पदार्थांत विष घालून कुत्र्यांना चारले असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने याबाबत नुकतेच महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात 14 ते 15 कुत्रे (Dogs at Akola) मरून पडलेल्या अवस्थेत पहायला मिळाले आहेत. डाबकी रोड, कौलखेड रोड, एमआयडीसी परिसर या भागात कुत्र्यांना पेढे व इतर पदार्थांमधून जाणीवपूर्वक विष दिले जात आहे. यानंतर कुत्रे अस्वस्थ होऊन लगेच मरून पडत आहेत. याबाबतच्या तक्रारी प्राणीप्रेमी संघटनांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
भूक कंट्रोल न झाल्याने हत्तीने खाल्ले चक्क…; पाहा व्हिडीओ
प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून कुत्र्यांच्या उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. शहर परिसरात कुठलाही कुत्रा अत्यावस्थ अवस्थेत दिसल्यास प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या ७३८५३५०७०१ या क्रमांकावर संपर्क करावा. किंवा पशुसंवर्धन विभागाच्या ( Animal Husbantry Department) प्राणी इस्पितळात घेऊन जावे. अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता