Site icon e लोकहित | Marathi News

कार्यकर्त्यांनी घातला तुफान राडा; स्वतः गौतमी पाटीलनेच थांबवला कार्यक्रम

Activists raised a storm; Gautami Patil herself stopped the program

लावणी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध लोककला समजली जाते. अनेक ठिकाणी आजही ही लोककला जोपासली आहे. परंतु, अलीकडच्या काळात लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. याला कारण म्हणजे लावणी कलाकार! मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील ( Gautami Patil) हे नाव अचानक चर्चेत आले आहे. लावणी करताना अश्लील हावभाव करणाऱ्या गौतमी पाटील हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतमी पाटीलची लावणी करण्याची पद्धत पाहून अनेक स्तरांतून तिच्यावर आरोप होत आहेत.

स्वारद फाउंडेशन आयोजित उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आणि रक्तदान शिबिर उत्साहात पार!

दरम्यान गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चुकीचे प्रकार होण्याच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यामधील कवठे यमाई या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी गौतमी स्टेजवर डान्स करत असताना तरुणाने गौतमीच्या बाजूला येऊन फटाका लावण्याचा प्रयत्न केला. गौतमीने तरुणच हे कृत्य पाहून लगेचच डान्स थांबवला.

अपघातांनंतर बच्चू कडू यांची कार्यकर्त्यांना विनंती; म्हणाले, “सर्वाना विनंती की कोणीही…”

या कार्यक्रमात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमात तसे नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु, रात्री उशिरा कार्यक्रम रंगात आल्यानंतर मात्र लोकांना चेव चढला आणि नियोजन ढासळले.

चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

Spread the love
Exit mobile version