Pravin Tarde : काळ्या मातीत मातीत….म्हणत अभिनेते प्रवीण तरडेंनी केला शेतातील ‘तो’ खास व्हिडीओ शेअर ; पाहा VIDEO

Actor Praveen Tarde shared a special video of 'To' from the farm; Watch the VIDEO

मुंबई : मराठी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते आपल्या चाहत्यांसाठी कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करत असतात. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर प्रवीण तरडे यांचा एक धम्माल व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातात नांगर घेऊन भात शेतीची लागवड केली आहे. या व्हिडिओ प्रवीण तरडे स्वतः बैल जोडी घेऊन शेतात राबताना दिसतायेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Eknath Khadse : “एकनाथ शिंदे कधी काय बोलतील याचा नेम नाही” मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेवरून एकनाथ खडसेंचा खोचक टोला

व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात .. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू .. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *