Ravindra Berde । सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

Ravindra Berde

Ravindra Berde । ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. (Ravindra Berde Passed Away) ते 78 वर्षांचे होते. ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते, त्यामुळे त्यांच्यावर काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात (Tata Hospitals) उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Rohit Pawar । रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक

रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सख्खे बंधू होते. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. (Ravindra Berde Movies) दरम्यान, रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांची नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली. त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

Manoj Jarange । मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, मनोज जरांगेंचा इशारा

त्यांनी खतरनाक,हमाल दे धमाल, हाच सुनबाईचा भाऊ, चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या 300 पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. त्यांना 1995 मध्ये व्यक्ती आणि वल्ली या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते.

Accident News । भीषण अपघात! ट्रॅक्टर पलटी झाल्याने 9 मजुर गंभीर जखमी

Spread the love