मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) त्याच्या ॲक्शन आणि त्याचे स्टंट्ससाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर टायगर श्रॉफच्या चित्रपटातील ॲक्शनचे (Action) प्रचंड चाहते आहेत. विशेष म्हणजे टायगरसुद्धा अनेकदा वेगवेगळे स्टंट्स करतानाचे व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असतो. दरम्यान आता नुकताच त्याने एक वॉशबेसिन (Wash Besin) तोडतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना टायगरची खूप काळजी वाटू लागली आहे. काळजी करण्याचं कारण हा सीन करताना टायगरच्या पायला दुखापत (leg injury) झाली आहे. या व्हिडीओत टायगर गुंडांशी लढाई करताना दिसत आहे. दरम्यान एका गुंडाला (the bully) मारताना टायगरला लाथेने बेसिन फोडायचे होते. त्याने ते फोडलेही पण बेसिन फोडताना त्याचा पायही तुटला.
Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत टायगरने म्हटले आहे की, “काँक्रीटचे वॉश बेसिन फोडताना माझा पाय मोडला. कारण मला वाटले की मी आधीपेक्षा अधिक ताकदवान आहे. पण मी मारल्याने ते बेसिनही तुटले.” दरम्यान हा व्हिडीओसोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. इतकंच असून अनेकांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही त्याच्या व्हिडिओवर ‘ओ माय गॉड’ अशी कमेंट केली आहे. तर दिग्दर्शक साबीर खान यानेही या व्हिडिओवर ‘हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्यावेळी आम्ही २४ तास सलग शूट केले.” अशी कमेंट केली आहे.
मोठी बातमी! इंदापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टींच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबरला ऊस परिषद
टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांची यादी हळूहळू वाढत चालली आहे. ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात टायगर श्रॉफ अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘गणपत’ हा चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांना टक्कर देताना दिसणार आहे. इतकंच नाही तर टायगर हा अक्षय कुमारसोबत ‘पेंच ढीला’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये देखील दिसणार आहे.
न्यायालयाचा मोठा निर्णय! पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही करू शकता व्हिडीओ रेकॉर्डिंग