मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये होय. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘चक्र’ हा आहे. अलका कुबल-आठल्ये यांचे नाव मनोरंजन विश्वात अगदी आदराने घेतले जाते. सध्या सोशल मीडियावर अलका कुबल यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढली, पुन्हा लॉकडाऊन? पाहा काय आहे परिस्थिती
सध्या अलका कुबल त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे खूप चर्चेत आल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांचा रॉयल लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या फोटोची जोरदार चर्चा सुर आहे.
थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या संशोधकाचं मत
त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्याचबरोबर भरपूर दागिने देखील परिधान केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राजमाता जिजाऊ यांचा लूक केला असून त्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं आहे.
अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार? शिरसाट स्पष्टच बोलले…
दरम्यान, अलका कुबल यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अलका कुबल यांनी केलेल्या या पोस्टवर कमेंट आणि लाईकचा पाऊसच पडत आहेत. आता ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
धक्कादायक घटना! लग्नाच्या अमिषाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार