अभिनेत्री अमृता सुभाष ४३ व्या वर्षी होणार आई?, इन्स्टाग्राम पोस्टने वेधल सर्वांचं लक्ष

Actress Amrita Subhash will become a mother at the age of 43? Instagram post caught everyone's attention

मुंबई : अभिनेत्री अमृता सुभाषने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने एक विशेष छाप उमटवली आहे. अभिनेत्री अमृताच वैशिष्टय म्हणजे ती नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करत असते. दरम्यान सध्या अमृताने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, गायीच्या तोंडात फोडला फटका; जबडाच झाला उद्ध्वस्तच

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी पोस्ट काय असेल. तर या पोस्टमागचं कारणही तितकंच खास आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं दिसत आहे. तसेच अमृताने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “ ओह, द वंडर बिगिन्स’.तसेच गरोदर महिलेचं इमोजीही तिने पोस्टद्वारे शेअर केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आल यश, एफआरपीची पहिली उचल 3100 रुपयाने घोषित

अमृताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे .थोड्याच दिवसांत आता अमृताच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तिने सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त करत याबाबत माहिती दिली. अमृताची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कलाक्षेत्रामधील मंडळीही कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत.

‘ट्विटरवर मला पुन्हा घेशील?, ट्विटर अकाउंटवरची बंदी हटवण्यासाठी कंगनाची एलन मास्कला लाडीगोडी

२००३ मध्ये दिग्दर्शक-अभिनेता संदेश कुलकर्णीसोबत अमृताचे लग्न झाले. आता या दोघांच्या लग्नाला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान लग्नाला १९ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृताने आई होण्याची गोड बातमी दिली आहे. आपल्या नव्या आयुष्याला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे सध्या अभिनेत्री अमृता व संदेश खूप खुश आहेत.

‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, ‘या’ सरकारने नवविवाहीत महिलांना विचारला आगळाववेगळा प्रश्न; वाचा सविस्तर

अमृताने मराठी चित्रपसृष्टीत वळू, श्वास, विहीर, हापूस, किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर गल्ली बॉय या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच सेक्रेड गेम्स-2, बॉम्बे बेगम्स आणि सास बहू आचार प्रा. ली या वेब सीरिजमध्ये देखील अमृताने काम केले आहे. तिच्या या अभिनयाचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.

कोंबड्याच्या ऐवजी कुर्बानी देणाऱ्याचाच गेला बळी, वाचा संपूर्ण घटना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *