दुर्वा, फुलपाखरू आणि मन उडू उडू झालं या मालिकांमधून पुढे आलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे ह्रता दुर्गुळे (Hruta Durugule) होय. हृताने फुलपाखरू या मालिकेत साकारलेले वेदहीचे पात्र प्रत्येक घराघरात पोहोचले. मालिकांमध्ये चमकल्यानंतर ह्रताने सिनेमा, नाटक आणि वेब सिरीजमध्ये नाव कमावले आहे. महाराष्ट्राची क्रश आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘मशाल’ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टानं दिला मोठा
आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रताने प्रचंड मोठा चाहतावर्ग कमावला आहे. मालिकांसह अनन्या आणि टाईमपास २ या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. हृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. हृता तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान सध्या ह्रताची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अरुंधती-आशुतोषने एकमेकांसाठी घेतला भन्नाट उखाणा; ऐकून तुम्हीही
पोस्ट शेअर करताना ह्रताने कॅप्शनमध्ये लिहिले की, आजचा दिवस खुप खास आहे. याबरोबर तिने #announcementsoon #happy #grateful #blessed #hrutadurgule, असे हॅशटॅगही वापरले आहेत. ह्रताची ही पोस्ट पाहून ती लवकरच मोठी घोषणा करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचवेळी ह्रताच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चेचा रंगली आहे.
गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून सन्मान; पुरस्कार सोहळ्यात म्हणते