मुंबई : अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. आता नुकतंच मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात माधुरीने हजेरी लावली. सध्या त्याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
Raj Thakarey: राज ठाकरे अँक्शन मोडवर, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून निवडले ‘हे’ पक्ष निरीक्षक
कोरोना (Corona) साथीमुळे गेली दोन वर्ष कोणत्याही प्रकारचे मोठे उत्सव झाले नाहीत. पण आता कोरोना परिस्थिती कमी झालेली पाहता अनेक गोविंदा पथकांनी रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडीची संधी साधत शक्तीप्रदर्शन केले. दहीहंडी पथकांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावेळीही भाजपा आमदार राम कदम (MLA Ram Kadam) हे घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. त्याचबरोबर यावेळी अभिनेत्री माधुरी पवार ही देखील या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती.
माधुरीने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरी अगं बाई अगं बाई या नव्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. माधुरीने तिच्या व्हिडिओला कॅप्शन देत राम कदम यांचे आभारही मानले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.